*राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी सुदर्शन बोराडे यांची निवड*

*राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी सुदर्शन बोराडे यांची निवड*

लातूर /प्रतिनिधी

अखिल भारतीय ओबीसी पुरस्कृत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी सुदर्शन बोराडे यांची निवड प्रदेश अध्यक्ष श्री चेतन नागोराव जी शिंदे नियुक्ती पत्र देऊन केली आहे. सुदर्शन बोराडे हे आपल्या समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रदेश अध्यक्ष चेतन जी नागोराव जी शिंदे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी सुदर्शन बोराडे यांची निवड केली आहे.तसे नियुक्ती पत्र देण्यात आले  असून त्यांच्या या निवडीबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर, राज्य समन्वयक डॉ अशोक जिवतोडे, तसेच राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुभाष घाटे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून संघटनेच्या कार्याला बांधील राहून तळागाळातील समाज बांधवापर्यत संघटनेचे महत्व व कार्य पोहोचवावे असे सांगितले आहे. सुदर्शन बोराडे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.